Ajit Pawar | ‘कुणी काही वेडवाकडं सांगितलं तर महत्व देऊ नका’;सदावर्तेंना टोला
कोणी काही वेडेवाकडे सांगितले तर त्याला महत्त्व देऊ नका, अजित पवार यांनी नाव न घेता ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशान साधला आहे.
एसटी महामंडळ वर्धापन दिन सोहळा आज साजरा होत आहे. यावेळी अजित पवारांच्या (Ajit Pawar) हस्ते शिवाई या ई-बसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला, त्या कार्यक्रमप्रसंगी त्यांनी सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत असल्याचे सांगितले.
गेली दोन वर्ष आपण कोरोनाच्या संकटात होतो. लॉकडाऊनमध्ये मोठी किंमत एसटीला मोजावी लागली. मध्ये काही अडचणी आल्या, संप झाला. आम्ही समजावून सांगत होतो, आपण एका परिवारातले आहोत. सुदैवाने पुढे मार्ग निघाला. आता याला दृष्ट लावू देऊ नका. कोणी काही वेडेवाकडे सांगितले तर त्याला महत्त्व देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. अजित पवार यांनी नाव न घेता ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशान साधला आहे. जे एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताचं असेल तेच महाविकास आघाडी सरकार करेल.ह शब्द एसटी महामंडाळाला देतो असं ही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
Published on: Jun 01, 2022 01:32 PM
Latest Videos