Chandrayaan-3 : ‘भारत अंतरिक्षामध्ये आपलं नाव अजरामर करणार’; रवी गोडसे यांचे कौतुत शब्द
भारताचे चंद्रयान 3 हे आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. याबाबत सध्या जोरदार चर्चा होत आहे. याचदरम्यान याबाबत डॉ. रवी गोडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : 23 ऑगस्ट 2023 | जगाच्या पाठीवर भारताकडून मोठी मोहिम हाती घेण्यात आली आहे. अख्या जगाचे डोळे भारताच्या चंद्रयान 3 मोहिमेवर लागली आहेत. यावरून जगभर भारताची चर्चा रंगली आहे. यावरून डॉ. रवी गोडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, लहान मुलगा होता. त्याचा बाबा राजा होता. पण सावत्र आई होती. त्या राजाचं नाव ऐकून आम्ही लहानपणी खूप हसायचो. राजाचं नाव होतं. उत्तान पादक. तर मुलाचं नाव ध्रुवबाळ. तर सर्व पाश्चात्य मीडिया ही जशी न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी भारताला नेहमी सावत्र आईसारखं वागवतात अशी टीका केली आहे. तर त्यांनी ते भारताला हिणवतात, कमी दाखवायचा प्रयत्न करतात असेही म्हटलं आहे. पण आज ध्रुव बाळाप्रमाणेच चंद्रयान 3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून का ही तासातच भारत अंतरिक्षामध्ये आपलं नाव अजरामर करणार आहे. इतिहासाला पुरून उरणारा पराक्रम आहे असे त्यांनी म्हटलं आहे. याचबरोबर आणखीन काय म्हटलं आहे पाहा डॉ. रवी गोडसे यांनी