Ambernath | अंबरनाथमध्ये मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात धिंगाणा, गाड्या अडवून हुज्जत
एका मद्यधुंद तरुणीने भररस्त्यात धिंगाणा घातल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये घडला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे. तरुणीने रस्त्यावरून जाणाऱ्या काही जणांना शिवीगाळ केली. अखेर तासाभराच्या तमाशानंतर ही तरुणी तिच्या मित्रासोबत निघून गेली.

अंबरनाथ पूर्व भागातील गोविंद पूल ते लोकनगरी या दरम्यान झालेल्या नवीन रस्त्यावर हा प्रकार घडला. गुरुवारी रात्री एक तरुण आपल्या परिवारासह या रस्त्यावरून कारने जात होता. यावेळी अचानक एक तरुणी गाडीसमोर आली आणि गाडीवर हात आपटत शिवीगाळ करू लागली. त्यामुळे या तरुणाने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणी पूर्णपणे नशेत होती.
Published on: Sep 03, 2021 09:59 AM
Latest Videos