गडचिरोलीत रेड अलर्ट; नगरम आणि धर्मपुरी येथे पूर परिस्थिती

गडचिरोलीत रेड अलर्ट; नगरम आणि धर्मपुरी येथे पूर परिस्थिती

| Updated on: Jul 28, 2023 | 2:14 PM

राज्यभरासह गडचिरोलीत जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याला पुराने वेढा घातला आहे.

गडचिरोली, 28 जुलै 2023 | राज्यभरासह गडचिरोलीत जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याला पुराने वेढा घातला आहे. तेलंगाणा राज्यातील कडेम धरणातून जवळपास 13लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून मेडीगट्टा धरणातूनही जवळपास 13 लाख 16 हजार पाण्याचा विसर्ग होत आहे. सिरोंचा तालुक्यात गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली. पूर परिस्थितीमुळे नगरम आणि धर्मपुरी येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम प्रशासनाने करत आहे.

Published on: Jul 28, 2023 02:14 PM