नागपूरमध्ये पावसाचा कहर, पाण्याचा नाही राखेचा पूर; राख युक्त पाणी शेतकऱ्यांच्या शेतात
याच्याआधी देखील मागील वर्षी राख युक्त पाणी शेतकऱ्यांच्या शेतात आलं होत. राख बंधारा फुटण्याची पुनरावृत्ती झालेली असून 2 वर्षांपूर्वीही हा राख बंधारा फुटला होता.
नागपूर, 20 जुलै 2023 | : राज्याच्या आता मोठ्य प्रमाणात पाऊस होताना दिसत आहे. नागपूरमध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला दिसत आहे. या दरम्यान मुसळधार पडणाऱ्या पावसाचा खापरखेडा औैष्णिक वीज प्रकल्प केंद्रालगतच वारेगाव येथे राख बंधाऱ्याला बसला आहे. येथे पडणाऱ्या मुसळघार पावसामुळे राख बंधारा बुधवारी पहाटे फुटला. त्यामुळे लाखो टन राख मिसळेल्या पाण्याच्या लोंढा सुमारे ८० एकर जमिनीवर पसरला आहे. तब्बल ८० एकर शेतात राख युक्त पाणी शिरल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याशिवाय २० एकरातील शेतीत राखमिश्रीत मलब्याचा थर पसरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाल्याचेही दिसून येत आहे. याच्याआधी देखील मागील वर्षी राख युक्त पाणी शेतकऱ्यांच्या शेतात आलं होत. राख बंधारा फुटण्याची पुनरावृत्ती झालेली असून 2 वर्षांपूर्वीही हा राख बंधारा फुटला होता. आता पुन्हा एकदा हा बंधारा फुटल्याने बंधारा दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे.