संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना घेरलं? ‘त्या’ केसमुळं हसन मुश्रीफ अडकणार?
tv9 special report | संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना घेरलय. संताजी घोरपडे साखर कारखान्यावरुन हसन मुश्रिफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप, हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी कट रचून पैसे जमा करुन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं निरीक्षण PMLA कोर्टानं नोंदवलंय
मुंबई, ८ ऑक्टोबर २०२३ | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर मुश्रिफांच्या घरी ईडीचे छापे पडले होते आणि प्रकरण PMLA कोर्टात गेलं. आता, कोर्टानं गंभीर निरीक्षणं नोंदवलीत. साखर कारखाना प्रकरणी मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी कट रचून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं कोर्टानं म्हटलंय. संजय राऊतांनी भाजपच्या किरीट सोमय्यांना घेरलंय. कारण सोमय्यांनी ज्या संताजी घोरपडे साखर कारखान्यावरुन हसन मुश्रिफांवर घोटाळ्याचे आरोप केले, त्यावरुन ईडीच्या PMLAकोर्टानं, हसन मुश्रिफांवर गंभीर निरीक्षणं नोंदवलीत. संताजी घोरपडे साखर कारखाना प्रकरणात मंत्री मुश्रिफांचे सीए महेश गुरव यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला आणि हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी कट रचून पैसे जमा करुन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं निरीक्षण PMLA कोर्टानं नोंदवलंय. सोमय्यांचा आरोप आहे की, 158 कोटींचं हसन मश्रिफांनी मनी लाँड्रिंग केलं. तर ईडीचा आरोप आहे की, साखर कारखान्याच्या उभारणीसाठी शेतकऱ्यांकडून 38-40 कोटी जमा केले आणि हे सर्व पैसे मुश्रिफांनी खासगी फर्ममध्ये गुंतवले. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट

'..बहुमत मिळालं म्हणून कोणी माज करू नये', शिंदेंच्या आमदाराचा टोला

ठाकरे बंधूंची युती अन पवार कुटुंबाचं मनोमिलन? शरद पवार स्पष्टच म्हणाले

सूर्यदेव कोपले! चंद्रपूर ठरला देशातला सर्वात हॉट जिल्हा

वकील अंजानच्या विरोधात ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी रवाना
