रोहित पवार यांची ईडी चौकशी अन् पोस्टरबाजीतून अजितदादांवर निशाणा, बघा काय डिवचलं?

रोहित पवार यांची ईडी चौकशी अन् पोस्टरबाजीतून अजितदादांवर निशाणा, बघा काय डिवचलं?

| Updated on: Jan 25, 2024 | 12:15 PM

रोहित पवार ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी शरद पवार गटाच्या समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. या कारवाईनंतर स्वतः आजोबा मैदानात उतरले तर ईडी कार्यालयात सुप्रिया सुळे देखील रोहित पवार यांच्यासोबत हजर राहिले.

मुंबई, २५ जानेवारी २०२४ : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार ईडीसमोर हजर झालेत. मात्र रोहित पवार ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी शरद पवार गटाच्या समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. या कारवाईनंतर स्वतः आजोबा मैदानात उतरले तर ईडी कार्यालयात सुप्रिया सुळे देखील रोहित पवार यांच्यासोबत हजर राहिले. तर दुसरीकडे रोहित पवार यांच्या समर्थकांनी पोस्टरबाजी करत अजित पवार यांना डिवचलंय. पोस्टर झळकावत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ठीक ११ वाजता अजित पवार ईडीच्या कार्यालयात गेले. शिखर बँकेशी संबंधित बारामती अॅग्रोच्या व्यवहारांवरून रोहित पवार यांची चौकशी सुरू झाली. यापूर्वी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी आपल्या कृतीतून रोहित पवार यांच्या पाठिशी उभं असल्याचे दाखवले. यावेळी शरद पवार स्वतः ईडी कार्यालयाजवळ असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात होते यावेळी रोहित पवार यांनी पाय पडून शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. तर सुप्रिया सुळे सुद्धा रोहित पवार यांच्यासोबत ईडी कार्यालयाच्या गेटपर्यंत हजर होत्या…नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

Published on: Jan 25, 2024 12:15 PM