'पळणारा नाहीतर...', रोहित पवार यांची ईडी चौकशी, समर्थकांची बॅनरबाजी, ED कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

‘पळणारा नाहीतर…’, रोहित पवार यांची ईडी चौकशी, समर्थकांची बॅनरबाजी, ED कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

| Updated on: Jan 24, 2024 | 10:47 AM

आज बारामती अ‍ॅग्रो कंपनी प्रकरणी रोहित पवार यांची ईडी चौकशी होत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचं मोठं शक्तिप्रदर्शन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. बलार्ड पियर परिसरात जागो-जागी रोहित पवारांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले आहेत.

मुंबई, २४ जानेवारी २०२४ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांना ईडीने १९ जानेवारी रोजी समन्स बजावले होते. तर आज बारामती अ‍ॅग्रो कंपनी प्रकरणी रोहित पवार यांची ईडी चौकशी होत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचं मोठं शक्तिप्रदर्शन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. बलार्ड पियर परिसरात जागो-जागी रोहित पवारांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले आहेत. ‘पळणार नाही तर लढणारा दादा’ असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे. तर ईडी कार्यालय परिसरात दडपशाहीच्या कारवाईचा निषेध…अशी घोषणाबाजी करत रोहित पवार यांच्या समर्थनार्थ शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे. या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. रोहित पवार यांची ईडी चौकशी आज होणार असल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Published on: Jan 24, 2024 10:47 AM