बदलापूर घटनेनंतर सरकारचे उघडले डोळे, शिक्षणमंत्र्यांनी खासगी शाळांना दिले निर्देश, ‘आता राज्यातील शाळांमध्ये….’

बदलापुरात एका नामांकित शाळेत चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार घडल्याची धक्कादायक घटना समोर आली. यानंतर बदलापुरात जनतेचा एकच संताप पाहायला मिळाला. याप्रकरणात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतक्रिया देत याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून खासगी शाळांना निर्देश दिले आहेत.

बदलापूर घटनेनंतर सरकारचे उघडले डोळे, शिक्षणमंत्र्यांनी खासगी शाळांना दिले निर्देश, 'आता राज्यातील शाळांमध्ये....'
| Updated on: Aug 21, 2024 | 12:20 PM

बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर सरकारचे डोळे उघडले आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खासगी शाळांना दिले आहेत. यासोबतच सर्व शाळांमध्ये विशाखा समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणाही केली आहे. बदलापूर येथे झालेल्या घटनेनंतर पीडित चिमुकलीच्या शाळेत सीसीटीव्ही नसल्याचे निदर्शनात आलं आहे. त्यामुळे दीपक केसरकर यांनी हे निर्देश दिले आहेत. प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही अनिवार्य करण्यात आले आहे. सरकारी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचं काम प्रगतीपथावर आहे. खासगी शाळांनाही हे अनिवार्य आहे, पण या शाळेतील सीसीटीव्ही बंद असल्याचं आढळून आलं. त्यामुळे सीसीटीव्ही बंद असेल तर जबाबदारी शाळेची असणार असल्याचेही दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. तर बदलापूर येथे घडलेले प्रकरण अत्यंत गंभीर आहे. अशी वेळ पुन्हा कोणावर येऊ नये, असे म्हणत दीपक केसरकर यांनी असेही सांगितले की, विशाखा समिती आता शाळेतही अनिवार्य असेल, मोठ्या विद्यार्थिनींसाठी विशाखा समिती असेल. याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.

Follow us
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.