Eknath Khadse : विचारांची लढाई विचारांनीच व्हावी, एकमेकांच्या अंगावर जाणं योग्य नाही; एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया
पन्नास खोके एकदम ओक्के अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या होत्या त्यानंतर हा वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
मुंबई : विचारांची लढाई विचारांनीच झाली पाहिजे. एकमेकांच्या अंगावर जाणे किंवा हात उगारणे हे काही योग्य नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे (NCP) विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिली आहे. अधिवेशन काळात विधानभवनाच्या सर्व कोड ऑफ कंडक्टचे पालन झाले पाहिजे. तत्वाची लढाई तत्वाने लढावी. असे एकोमेंकांच्या अंगावर जाणे किंवा हात उगारणे योग्य नाही. निषेध किंवा आंदोलन हे शांततेच्या मार्गाने व्हावे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. आज सकाळी विधान भवनाच्या परिसरात आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली होती. पन्नास खोके एकदम ओक्के अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या होत्या त्यानंतर हा वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी ही प्रतिक्रिया दिली.