'पोलीस हतबल होऊन साथ देत आहेत', जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

‘पोलीस हतबल होऊन साथ देत आहेत’, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

| Updated on: Mar 14, 2023 | 7:36 AM

कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात बसवून त्रास दिला जात आहे. ठाण्यामध्ये दबावाचं वातावरण चालू आहे. पूर्ण जिल्हा ताब्यात घेण्यासाठी पोलीसांचा वापर सुरू आहे.

मुंबई : राज्यातील मविआ सरकार कोसळवत एकनाथ शिंदे यांनी भाजपला सोबत घेत सत्ता स्थापन केली. त्यानंतर त्यांनी अनेकांना त्रास द्यायला सुरूवात केल्याचे आरोप होत आहेत. असाच आरोप राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखिल केला आहे. आव्हाड यांच्या काही कार्यकर्त्यांवर तडीपारीची कारवाई केली जात असल्यावरून त्यांनी हा आरोप केला आहे. कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात बसवून त्रास दिला जात आहे. ठाण्यामध्ये दबावाचं वातावरण चालू आहे. पूर्ण जिल्हा ताब्यात घेण्यासाठी पोलीसांचा वापर सुरू आहे. आपण जे करतोय ते चुकीचं करतोय हे ही पोलिसाना कळतयं. पण ते हतबल होऊन साथ देत आहेत असेही आव्हाड म्हणाले. यावेळी आनंद परांजपे यांनी देखिल, ठाणे पोलीस एकनाथ शिंदेंची खाजगी आर्मी म्हणून काम करत असल्याचा आरोप केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस यांच्या पदाधिकाऱ्यांच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करणे केले जात आहेत. हा एक कलमी कार्यक्रम ठाणे पोलिसांचा गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे. तर ठाणे पोलीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रायव्हेट आर्मी असल्यासारखं काम करत असलायाचा आपला थेट आरोप असल्याचेही परांजपे यांनी म्हटलं आहे.

Published on: Mar 14, 2023 07:36 AM