'कलंक' शब्दावरून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावलं; म्हणाले, बाळासाहेबांची भूमिका...

‘कलंक’ शब्दावरून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावलं; म्हणाले, “बाळासाहेबांची भूमिका…”

| Updated on: Jul 12, 2023 | 1:46 PM

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका करताना देवेंद्र फडणवीस यांचा उच्चार ‘कलंक’ असा केला. यावरून महाराष्ट्राच्या राजकारण तापलं आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरून भाजप आक्रमक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका करताना देवेंद्र फडणवीस यांचा उच्चार ‘कलंक’ असा केला. ‘कलंक’ या शब्दावरून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरून भाजप आक्रमक झाली आहे. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी देखील या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. याच पार्श्वभूणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “2019 ला ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका आणि त्यांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम केलं, ज्यांनी बाळासाहेबांच्या नावाला कलंक लावला त्या कलंकित लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या लोकांवर कलंक असल्याचा आरोप करणं हे हास्यास्पद आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन दिसून येतंय की, त्यांच्या राजकारणाची पातळी किती खाली घसरली आहे. यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे.”

Published on: Jul 12, 2023 01:17 PM