Eknath Shinde : आमच्यात सगळं काही खुश खुश आहे; एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण
Eknath Shinde About Mahayuti Dispute : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे अर्थ खत्याबद्दल तक्रार केल्याची चर्चा सुरू होती. त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमच्यात काहीही धुसफूस नाही. सगळं काही खुश खुश आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे. आम्ही काम करणारे लोक आहे. तक्रारीचं रडगाण गात नाही. काही असेल तर चर्चेतून सर्व सुटेल, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी अर्थ खात्याबद्दल अमित शाह यांच्याकडे तक्रार केली असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
Published on: Apr 13, 2025 04:59 PM
Latest Videos
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर

