खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स कायम

खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स कायम

| Updated on: Dec 11, 2024 | 6:02 PM

खाते वाटपाचा तिढा न सुटल्यामुळे दिल्लीमध्ये बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वरिष्ठाच्या भेटीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. तर एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार की नाही? यासंदर्भात चर्चा सुरू आहे. खाते वाटपाचा तिढा न सुटल्यामुळे दिल्लीमध्ये बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीत काही खात्यावरून असमन्वय असल्यामुळे मंत्रिमंडळ रखडल्याची सूत्रांची माहिती असून तशी चर्चा सुरू आहे. अशातच अद्याप भाजपची यादी देखील फायनल झालेली नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असल्याने सत्ताधारी आमदारांसह इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे. अशातच कोणा-कोणाला महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागले आहे. भाजपच्या वाट्याला २०, शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला १२, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला १० मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत येत्या एक ते दोन दिवसात राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचा दावा शिंदेंच्या शिवेसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे. बघा काय म्हणाले संजय शिरसाट?

Published on: Dec 11, 2024 06:02 PM