Video | आमदार पकडून आणणारे ते आमदार पळवून नेणारे 'एक'नाथ शिंदे

Video | आमदार पकडून आणणारे ते आमदार पळवून नेणारे ‘एक’नाथ शिंदे

| Updated on: Jun 22, 2022 | 10:39 PM

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत असताना लोकांच्या गर्दीतून लोकप्रतिनिधी घेऊन येत असतानाच एकनाथ शिंदे दिसतात तर महाविकास आघाडीच्या अडीच वर्षानंतर त्या गर्दीतीलत एकनाथ शिंदे आता मात्र भूमिका बदलून आमदारांना घेऊन येणारे शिंदे दुसऱ्या चित्रात मात्र शिवसेनेच्याच आमदारांना घेऊन जाताना दिसून येत आहेत.

मुंबईः महाराष्ट्रात 2019 मध्ये ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government)  स्थापन झाले त्यावेळी मोठा गदारोळ झाला होता. तीन पक्ष एकत्र येऊन सत्ता येऊन सत्ता स्थापन केल्यानंतर विरोध पक्ष म्हणून भाजपकडून (BJP) त्यावेळी प्रचंड मोठी टीका झाली होती. त्यावेळी सत्ता स्थापनेच्या नाट्यतही एकनाथ शिंदे यांचीही महत्वाची भूमिका होती. त्यांवेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आमदार पकडून आणणारा नेता म्हणून संबोधलं जात होतं मात्र परवा विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आमदारांना सोबत घेऊन थेट सूरत गाठले होते.

पकडून आणणारे ते पळवून नेणारे

त्यामुळे यावेळी एकनाथ शिंदे यांच्या आमदार पकडून आणणारे ते आमदार पळवून नेणारे अशी टीका एकनाथ शिंदे यांच्यावर होत आहे.

तीन पक्षातून साकारले सरकार

महाविकास आघाडीच्या राजकीय वाटचालीतील या दोन्ही घटना महत्वाच्या आहेत. पहिली घटना म्हणजे सरकार स्थापन करताना तीन पक्षांचा आधार घेऊन झालेली सत्तास्थापना आणि दुसरी म्हणजे विधान परिषदेच्या निकालानंतर नाराजीनाट्य करत एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळेच मविआ सरकारच्या घटनेतील या दोन्ही घटना महत्वाच्या आहेत.

एकनाथ शिंदे एकच भूमिका मात्र दोन

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत असताना लोकांच्या गर्दीतून लोकप्रतिनिधी घेऊन येत असतानाच एकनाथ शिंदे दिसतात तर महाविकास आघाडीच्या अडीच वर्षानंतर त्या गर्दीतीलत एकनाथ शिंदे आता मात्र भूमिका बदलून आमदारांना घेऊन येणारे शिंदे दुसऱ्या चित्रात मात्र शिवसेनेच्याच आमदारांना घेऊन जाताना दिसून येत आहेत.

Published on: Jun 22, 2022 10:39 PM