‘आम्ही गाजर हलवा तरी दिला, तुम्ही…’, अर्थसंकल्पावर एकनाथ शिंदे यांचं उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर
VIDEO | आम्ही काहीच शिल्लक ठेवलं नाही, त्यांची बोलती बंद; नेमकं काय दिलं विरोधकांच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर
मुंबई : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आज अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी मोठ्या घोषणा केल्या, यानंतर विरोधकांनी शिंदे सरकारवर चांगलाच निशाना साधला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे गाजरचा हलवा आहे, अशी टीका केली. या टीकेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. खरं म्हणजे गाजर हलवा तरी आम्ही देतोय. त्यांनी काहीच दिलं नाही. त्यांनी स्वत: खाललं, दुसऱ्याला उपाशी ठेवलं. मी त्याच्यात जात नाही. आम्ही जो अर्थसंकल्प मांडलेला आहे तो वस्तुनिष्ठ आहे. याचे परिणाम तुम्हाला दृश्य स्वरुपात दिसतील. या अर्थसंकल्पात आम्ही प्रत्यक्षात दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे काही उत्तरच नाही. त्यांचे चेहरे बघण्यासारखे होते. अरे हे आकडे, योजना, काय-काय चाललंय? आम्ही काहीच शिल्लक ठेवलं नाही. त्यांची बोलती बंद झाली आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.