Special Report | सर्वोच्च न्यायालयाचा शिंदेंना दिलासा
गटनेते पदावरुन काही वाद असेल तर विधानसभा अध्यक्षांनी त्यासंदर्भात तपासणी करावी अशी सूचनाही त्यावेळी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गटनेते पदावरून टिपणी केल्यानंतर शिंदे गटाने एकनाथ शिंदे यांनाच गटनेते म्हणून निवडले आहे.
शिवसेनेतून बंडखोरी करून शिंदे-फडणवीस गटाने सत्ता स्थापन करण्यात आली मात्र त्यानंतर बंडखोर आमदारांमधील 16 आमदारांवर अपात्रतेचा ठपका ठेऊन न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू असतानाच न्यायालयाकडून गटनेता बदलणं हा संबंधित पक्षातील अंतर्गत बाब असल्याचे म्हणत, पक्षातील मोठ्य गटालाच गटनेता बदलण्याचा अधिकार असल्याच सरन्यायाधीशांनी सांगितले आहे. तसेच गटनेते पदावरुन काही वाद असेल तर विधानसभा अध्यक्षांनी त्यासंदर्भात तपासणी करावी अशी सूचनाही त्यावेळी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गटनेते पदावरून टिपणी केल्यानंतर शिंदे गटाने एकनाथ शिंदे यांनाच गटनेते म्हणून निवडले आहे.
Published on: Jul 20, 2022 08:44 PM
Latest Videos