Sanjay Gaikwad : ‘हिंदीच नाही तर उर्दूही पहिलीपासून शिकवलं पाहिजे कारण…’, शिंदेंच्या नेत्यानं केलेल्या वक्तव्यानंतर वाद उफाळणार?
नुकताच पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. पर्यटक बेसावध असताना अचानक दहशतवादी आणि त्यांनी धर्मा विचारच पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
हिंदी भाषाच नाही तर उर्दू भाषाही पहिलीपासून शिकवली पाहिजे, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय गायकवाड यांनी केलंय. आपल्याला उर्दू भाषा समजत नाही, आंतकवाद्यांची भाषा समजत नाही म्हणून ते पकडले जात नाहीत, असंही संजय गायकवाड यांनी म्हटलंय. दरम्यान, उर्दू भाषाही पहिलीपासून शिकवली असं भुवया उंचावणारं वक्तव्य केल्याने संजय गायकवाड आता चांगलेच चर्चेत आले आहेत. ‘जे कोणी म्हणतं हिंदी शिकवली गेली नाही पाहिजे, हिंदी राष्ट्र भाषा नाही. पण ज्यावेळी आम्ही महाराष्ट्राबाहेर जातो तेव्हा आम्ही फक्त मराठी थोडी बोलतो. जर मराठी शिवाय आपल्याला कोणतीच भाषा आली नाही तर आपण तिथे काय करायचं. आपलं पोरगं जगत फिरायला जाईल तर त्याला जगातील भाषा आली पाहिजे’, असं संजय गायकवाड म्हणाले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासूनच हिंदी भाषा सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्याला मनसेकडून विरोध करण्यात आला. हिंदी भाषा सक्तिवरून सुरू असलेल्या वादादरम्यान, सरकारकडून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय स्थगित करण्यात आला.

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?

'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा

पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा

'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
