Sanjay Raut यांची अवस्था म्हणजे धोबी का कुत्ता, न घर का ना घाट का; शिंदे गटातील नेत्याचा निशाणा
VIDEO | एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना सडकून टीका केली. ते म्हणाले, 'संजय राऊत यांची ही घणाघाती नाही तर घाण टीका आहे. त्यांना खाली वाकून पाहण्याची सवय आहे.'
मुंबई, ७ ऑक्टोबर २०२३ | राज्यसरकारच्या चड्डीचा नाडा दिल्लीच्या हाती आहे. देवेंद्र फडणवीस मदारी झाले आहेत. हे दोघे माकडं आहेत. फडणवीस डमरू वाजवत आहेत. डम डम डम डम… हे दोघे नाचत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. संजय राऊत यांनी केलेल्या या टीकेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘संजय राऊत यांची ही घणाघाती नाही तर घाण टीका आहे. त्यांना खाली वाकून पाहण्याची सवय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर इतक्या खालच्या पातळीवर जात टीका करणारे याआधी आम्ही पाहिले नाहीत. नशिब फक्त नाडी आणि बेल्ट राहीला. त्याखाली काय आहे ते पाहीले नाही’, असे म्हणत संजय शिरसाट यांनी खोचक टोलाही लगावला. तर देवेंद्र फडणवीस डमरू वाजवतात. तर मग तुम्ही काय करता? संजय राऊत तुम्ही धोबी का कुत्ता… न घर का ना घाट का… शिंदे फकीर , त्यांना लालच नाही, असेही शिरसाट म्हणाले.