Santosh Bangar : ‘हे ध्यानात ठेवा…पेशन्टला काही कमी जास्त झालं तर…’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं, ऑडिओ व्हायरल
शिवसेना आमदार संतोष बांगर यांची एक ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. अकोला येथील खासगी रूग्णालयाला चांगलंच झापलं असल्याची संतोष बांगर यांची ऑडिओ क्लिप आहे. या क्लिपची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी अकोला येथील खासगी रूग्णालयाला चांगलंच झापल्याचे पाहायला मिळत आहे. रूग्णालयातील डॉक्टरांना संतोष बांगर यांनी फटकारल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. डिपॉझिट न भरल्याने कार्यकर्त्याच्या मुलीला रूग्णालयात दाखल करून न घेतल्याचा आरोप संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्याने केलाय. घडलेल्या प्रकरानंतर संतोष बांगर यांनी अकोल्यातील रूग्णालय प्रशासनाला इशारा देत चांगलंच फटकारल्याचे व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळतेय. ‘कोणतं हॉस्पिटल आहे तुमचं… पेशन्टच्या कुटुंबीयाकडे पैसे नाहीतर तुम्ही पेशन्टला व्हेटिंलेटरवर घेत नाही, असं करता तुम्ही… पैसे नाही तर पेशन्टला व्हेटिंलेटरवर घेत नाही म्हणतात… जर पेशन्टला काही कमी जास्त झालं तर हॉस्पिटलला लॉक लावेल हे ध्यानात ठेवा…’, असा कडक शब्दात इशारा देत संतोष बांगर यांनी रूग्णालय प्रशासनाला चांगलंच फटकारलंय. दरम्यान, व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.