‘आनंद दिघे यांच्या अंत्ययात्रेला उद्धव ठाकरे का नव्हते?’ संजय शिरसाट यांचा सवाल
VIDEO | 'आनंद दिघे यांच्या घातपाताचा बदला ठाणेकर घेतील', शिंदे गटाच्या आमदारानं उद्धव ठाकरे यांना दिला इशारा
छत्रपती संभाजीनगर, ३० जुलै २०२३ | आनंद दिघे यांच्या अंत्ययात्रेला उद्धव ठाकरे का गेले नव्हते? असा सवाल उपस्थित करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. संजय शिरसाट माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘ आनंद दिघे साहेबांनी आपलं आयुष्य शिवसेनेसाठी वेचलं त्यांच्या अंत्ययात्रेला उद्धव ठाकरे कुटुंबातील एकही माणूस उपस्थित नव्हता, का नव्हता हा माझा प्रश्न आहे’. पुढे ते असेही म्हणाले की, ‘ज्यांनी दिघे साहेबांचा घात केला त्यांना ठाणेकर माफ करणार नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, घोषणैा करा पण ठाणेकर बदला घेण्यासाठी तयार आहेत. दिघे साहेबांचा हा घातपात आहे आणि हे सर्वांना माहीत आहे. डिस्चार्ज मिळण्याच्या मार्गावर असताना दिघे साहेबांचा मृत्यू झाला आणि लोकांनी ते पाहिले’, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.