Special Report | एकनाथ शिंदेंचं मिशन ‘धनुष्यबाण’
शिंदे गट हा शिवसेनेच्या धनुष्यबाणावर आता आपला हक्क सांगत आहे, मात्र यावर कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी सांगितले आहे की, ज्या पक्षाच्या चिन्हावर एकनाथ शिंदे दावा सांगतात, त्या पक्षावर कायदेशीररित्या दावा करता आले तरच त्यांची शिवसेना असेल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 55 पैकी 40 आमदार फोडले, त्यानंतर आता त्यांचा हट्टाहास शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह घेण्याकडे वळला आहे. आपल्याकडे आहे ती खरी शिवसेना असा त्यांचा दावा आहे, आणि त्याच दाव्यामुळे त्यांनी लोकसभा अध्यक्षांनाही शिवसेनेच्या फुटलेल्या खासदारांना घेऊन पत्र दिले आहे. त्यामुळे शिंदे गट हा शिवसेनेच्या धनुष्यबाणावर आता आपला हक्क सांगत आहे, मात्र यावर कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी सांगितले आहे की, ज्या पक्षाच्या चिन्हावर एकनाथ शिंदे दावा सांगतात, त्या पक्षावर कायदेशीररित्या दावा करता आले तरच त्यांची शिवसेना असेल असंही कायदेतज्ज्ञ असीम सरोदे सांगत आहेत, त्याबरोबरच एकनाथ शिंदे जे सांगत आहेत, ते चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
Latest Videos