भाजपकडून संख्याबळाची तपासणी सुरु, देवेंद्र फडणवीसांची दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी चर्चा
अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे दोघही गुवाहाटीला जातील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. पण आता हाती आलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हे पक्षश्रेष्ठीसोबत संपर्कात आहेत.
मुंबई: देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadanvis) दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरु. गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही बड्या नेत्यांचं या सगळ्या घटनांकडे बारीक लक्ष आहे. कालपासून या सगळ्या घडामोडी सुरु असताना देवेंद्र फडणवीस दिल्लीत असल्याची चर्चा होती. मात्र ते दिल्लीत कुठे आहेत कुणासोबत आहेत याबाबतची कुठलीही बातमी समोर येत नव्हती. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे दोघही गुवाहाटीला जातील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. पण आता हाती आलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हे पक्षश्रेष्ठींसोबत संपर्कात आहेत. भाजपकडून (BJP) संख्या बळाची तपासणी सुरु आहे.
Published on: Jun 22, 2022 12:14 PM
Latest Videos