अजितदादांनंतर पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी कोण? 'ही' दोन नावं चर्चेत, कोणाची लागणार वर्णी?

अजितदादांनंतर पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी कोण? ‘ही’ दोन नावं चर्चेत, कोणाची लागणार वर्णी?

| Updated on: Oct 27, 2023 | 12:43 PM

VIDEO | गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाची जबाबदारी सांभाळलेल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता संचालक पदासाठी ८ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. कुणाची लागणार वर्णी?

पुणे, २७ ऑक्टोबर २०२३ | उपमुख्यमंत्रीपदाचा वाढता व्याप आणि पक्षाची वाढती जबाबदारी लक्षात घेता अजित पवार यांनी १० ऑक्टोबर रोजी जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता. तर अजित पवार यांनी राजीनामा दिला असला तरी अजित पवार यांचं मार्गदर्शन घेऊ, असे बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडी यांनी म्हटलं होतं. मात्र आता पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदाची ८ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. अजितदादांनी अचानक राजीनामा दिल्याने ही निवडणूक होत आहे. तर या संचालकपदासाठी पार्थ पवार आणि मदन देवकाते यांची नाव चर्चेत आहे. त्यामुळे ८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीनंतर संचालकपदी पार्थ पवार की मदन देवकाते यांपैकी कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्तावाचं ठरणार आहे.

Published on: Oct 27, 2023 12:43 PM