Old Pension : शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, नवं वर्षातील जुन्या पेन्शनबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय
2005 पूर्वी शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील साडे चार ते पाच हजार कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे.
मुंबई, ४ जानेवारी २०२४ : शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 2005 पूर्वी शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळातील बैठकीत जुन्या पेन्शनसंदर्भात चर्चा झाली आणि मोठा निर्णय घेण्यात आला. 2005 पूर्वी शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील साडे चार ते पाच हजार कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी नागपूरला मोर्चा धडकल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठक घेतली होती. यावेळी आंदोलकांना प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द दिला होता. या आंदोलकांनी दोन महिन्याची मुदत दिली होती. या मुदतीच्या आत सरकारने हा निर्णय घेतला. त्यांच्या मागण्या समोर आहेत. त्यावर समिती काम करत आहे. अधिकारीही काम करत आहेत. जुन्या पेन्शनधारकांना योग्य न्याय देऊ, असं राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारच्या वतीने सांगितलं.