Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात भटकंती करणाऱ्या पर्यटकांसाठी मोठी बातमी, 'सांधण व्हॅली'ला जाताय? तर थोडं थांबा कारण....

पावसाळ्यात भटकंती करणाऱ्या पर्यटकांसाठी मोठी बातमी, ‘सांधण व्हॅली’ला जाताय? तर थोडं थांबा कारण….

| Updated on: Jun 18, 2024 | 12:41 PM

महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कुशीत लपलेली अनेक ठिकाणं नेहमीच पर्यटकांना भुरळ घालत असतात. याच निसर्गाच्या कुशीत दडलेलं एक अद्भुत ठिकाण म्हणजे 'सांधण व्हॅली' किंवा 'सांधण दरी'. हे ठिकाण आजही अनेकांच्या नजरेपासून दूर आहे. पण या पावसाळ्यात तुम्ही 'सांधण व्हॅली'ला जाण्याचा प्लान करताय ? तर थोडं थांबा

पावसाळा सुरू झाला की सर्वच हौशी पर्यटकांना पावसाळी पिकनिकला जाण्याचा मोह आवरत नाही. असे पर्यटक निसर्गाच्या कुशीत दडलेले कोणते न् कोणते स्पॉट नेहमीच शोधत असतात. त्यातील एक प्रसिद्ध आणि थरार अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक अहमदनगर जिल्ह्यातील सांदन दरीला आवश्य भेट देतात. मात्र तुम्ही जर आता तेथे जाण्याचं प्लान करत असाल तर थोड थांबा हा व्हिडीओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सांदन दरी येथे पर्यटकांना पुढील चार महिने प्रवेश बंदी करण्यात आली आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात साम्रद येथे आशिया खंडातील सर्वात खोल अशी सांदन दरी आहे. प्रत्येक वर्षी देशभरातील हजारो पर्यटक सांदन दरीला भेट देत असतात. मात्र पावसाळ्यात या दरीच्या प्रवेशद्वारातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वन विभागाने चार महिने सांदन दरी येथे प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Published on: Jun 18, 2024 12:41 PM