Special Report : पुस्तक पवार यांचं,निशाणा ठाकरे यांच्यावर, भर बैठकीत फडणवीस यांनी उडवली खिल्ली
राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नुकतंच 'लोक माझे सांगाती' या सुधारित आवृत्तीचं पुस्तक प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात त्यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. याच पुस्तकाचा आधार घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना फैलावर घेतले.
पुणे : राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नुकतंच ‘लोक माझे सांगाती’ या सुधारित आवृत्तीचं पुस्तक प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात त्यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. याच पुस्तकाचा आधार घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना फैलावर घेतले. भाजपची प्रदेश कार्यकरिणीची बैठक पुण्यात झाली. यावेळी फडणवीस यांनी पुस्तकाचे वाचन करत ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. पुस्तकात शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दव काय लिहिलं आहे, हे देवेंद्र फडणवीसांनी बैठकीत वाचून दाखवले. ‘ठाकरे यांच्यावर आम्ही करत असलेले आरोप चुकीचे नव्हते’, असेही फडणवीस यांनी म्हटले. फडणवीस यांनी ‘लोक माझे सांगाती’या पुस्तकाचा आधार घेत ठाकरे यांच्यावर काय टीका केली यासाठी पाहा एक स्पेशल रिपोर्ट…
Published on: May 19, 2023 08:31 AM
Latest Videos