Gautami Patil हिच्या अडचणी वाढणार? अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल, पण का?

Gautami Patil हिच्या अडचणी वाढणार? अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल, पण का?

| Updated on: Sep 29, 2023 | 5:32 PM

VIDEO | कोणत्या न् कोणत्या कारणानं चर्चेत असणाऱ्या प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिची अडचणी वाढवणारी बातमी आली समोर, अहमदनगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रहदारीस अडथळा केल्याबद्दल गौतमी आणि कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल

अहमदनगर, २९ सप्टेंबर २०२३ | प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा डान्स म्हटला की तरूणांची मोठी गर्दी होत असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळवताना बऱ्याचदा पोलिसांची देखील तारांबळ उडते. गौतमी पाटील हिचा जिथे कार्यक्रम असेल त्या ठिकाणी पोलीस प्रशासनावर ताण निर्माण होतो. दरम्यान, कोणत्या न् कोणत्या कारणांमुळे चर्चेत असणाऱ्या गौतमी पाटीलसाठी एक वाईट बातमी आहे. अहमदनगरमध्ये गौतमी पाटील हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोडवर काल सायंकाळी मृत्यूंजय प्रतिष्ठान गुलमोहर रोड आणि एकदंत मित्र मंडळ यांच्यावतीने गौतमी पाटील हिचा नृत्याचं आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण केल्याबद्दल गौतमी आणि आयोजकांवरही गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Published on: Sep 29, 2023 05:32 PM