एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं होणार; जाणून घ्या काय आहे Farmer Digital ID

एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं होणार; जाणून घ्या काय आहे Farmer Digital ID

| Updated on: Dec 25, 2024 | 1:29 PM

नवीन वर्षात शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून खास भेट मिळणार आहे. ही भेट म्हणजे 'शेतकरी ओळखपत्र'. शेतकऱ्यांना आधार कार्डप्रमाणेच एक 12 अंकांचं खास ओळखपत्र देण्यात येणार आहे. या डिजिटल आयडीचा फायदा काय, ते पाहुयात..

केंद्र सरकारच्या डिजिटल कृषी अभियानाअंतर्गत देशातील प्रत्येक शेतकऱ्याची डिजिटल ओळख निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी शेतकरी ओळखपत्र बनवलं जाणार आहे. 11 कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. या एका कार्डद्वारे शेतकरी सन्मान निधी, शेतकरी क्रेडिट कार्ड आणि पीक विक्री यांसारखी अनेक कामं केली जातील. केंद्र सरकारने आता राज्यांना शेतकरी ओळखपत्र बनवण्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकरी ओळखपत्र ही आधारशी जोडलेली डिजिटल ओळख आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे वैयक्तिक तपशील, पेरणी केलेल्या पिकांची माहिती आणि जमिनीच्या मालकीचाही समावेश असेल. या कार्डमध्ये शेतकऱ्यांची जमीन, गुरंढोरं आणि त्यांनी पेरलेल्या पिकांची माहिती नोंदवली जाणार आहे. या कार्डमुळे किमान आधारभूत किंमत (MSP) आणि शेतकरी क्रेडिट कार्डसारख्या योजनांसाठी अर्ज करताना पडताळणीची गुंतागुंत कमी होण्यात मदत होईल. या ओळखपत्राविषयीची सविस्तर माहिती व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात..

Published on: Dec 25, 2024 01:29 PM