माढात भाजपच्या बैठकीत शेतकऱ्याच्या ‘त्या’ प्रश्नानं उडाला गोंधळ, चंद्रकांत पाटलांनी शेतकऱ्याला विचारला पक्ष?
माढात भाजपच्या बैठकीत एका शेतकऱ्याने फसवणुकीचा आरोप केला आणि गोंधळ उडाला. या झालेल्या प्रकारामुळे भाजपला बैठक थोडक्यात उरकावी लागली. शेतकरी संपत काळेंनी केंद्र सरकारच्या योजनेत फसवणुकीचा आरोप करत खासदार रणजित नाईक निंबाळकरांकडे पाठपुरावा करून दाद नाही?
भाजपाच्या बैठकीवेळी एका शेतकऱ्याने आपली फसवणूक झाल्याचा मुद्दा मांडला. त्यावरून एकच गोंधळ उडाला. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेत. माढात भाजपच्या बैठकीत एका शेतकऱ्याने फसवणुकीचा आरोप केला आणि गोंधळ उडाला. या झालेल्या प्रकारामुळे भाजपला बैठक थोडक्यात उरकावी लागली. शेतकरी संपत काळेंनी केंद्र सरकारच्या योजनेत फसवणुकीचा आरोप करत खासदार रणजित नाईक निंबाळकरांकडे पाठपुरावा करून दाद न मिळाल्याचा आरोप केला. मात्र तुम्ही कोणत्या पक्षाकडून आला आहात? या चंद्रकांत पाटलांच्या प्रश्नांने मोठी भर पडली. तर शेतकऱ्याचा दावा आहे की, माढातील काही शेतकऱ्यांची केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकांनी भेट घेतली होती.त्या भेटीत शेतकऱ्यांना शतावरी लागवडीसाठी प्रोत्साहन दिलं गेलं यावेळी चांगल्या उत्पन्नाचीही आश्वासनं मिळालं. मात्र संबंधित कंपनीने पीकच विकत घेतलं नाही, असा आरोप शेतकऱ्यांचा आहे. ज्यामध्ये लाखोंचं नुकसान झाल्याचा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.