मोदी सरकारविरोधात शेतकरी आक्रमक, ‘या’ दिवशी सर्व राज्यात आंदोलनाची हाक
VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांकडून आंदोलनाची हाक, मुंबईत झालेल्या संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत या आंदोलनाची घोषणा, 26 ते 28 नोव्हेंबर दरम्यान सर्व राज्यांच्या राजधानीत मोदी सरकारविरोधात आंदोलन
मुंबई, ६ सप्टेंबर २०२३ | पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांकडून आंदोलनाची हाक देण्यात येणार आहे. येत्या 26 ते 28 नोव्हेंबर दरम्यान सर्व राज्यांच्या राजधानीमध्ये मोदी सरकारविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईत झालेल्या संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत या आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. यासह संयुक्त किसान मोर्च्यातील एकूण 27 संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तर मुंबईत झालेल्या बैठकीत 13 सदस्यांची समन्वय समितीची स्थापना देखील यावेळी करण्यात आली. या स्थापना संमेलनाच्या निमित्ताने शेतीवर अवलंबून असणारे सर्व घटक शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, शेतीत राबणाऱ्या महिला आदिवासी, मच्छिमार या सर्वाच्या प्रश्नावर 7 संघटनेच्या बैठकीत विस्तृत चर्चा यावेळी करण्यात आली.
Published on: Sep 06, 2023 10:11 AM
Latest Videos