केंद्राने घेतलेल्या निर्णयामुळे देशाच्या शेतकऱ्यांचे नुकसान – शरद पवार

| Updated on: Dec 11, 2023 | 2:17 PM

नुकताच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी शेकऱ्यांच्या व्यथा मांडत सरकारवर कठोर टीका केली आहे. कांद्याच्या संदर्भात केंद्राने घेतलेल्या निर्णयाला शरद पवार यांनी विरोध केला आहे. शिवाय अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं.. त्यावर देखील सरकराने ठोस पाऊल उचलली नाहीत... यावर देखील शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

मुंबई | 11 डिसेंबर 2023 : चांदवड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर संबोधित करताना शरद पवार यांनी केंद्र सरकारवर कठोर टीका केली. शिवाय शेतकऱ्यांच्या व्यथा दिल्लीत मांडणार असं वक्तव्य देखली शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केलं. नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी आहे. त्याला 2 पैसे मिळण्याची संधी येत असते. पण केंद्राने घेतलेल्या निर्णयामुळे देशाच्या शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. बाजार भाव देखील पडले, बाहेर देशात जाणारा माल देखील अडकला आणि त्यांचं नुकसान झालं. संपूर्ण देशातील निर्यात थांबवली आहे, काही देशांनी याचा फायदा घेतला होता. कांद्याची गरज आहे, पण भारत सरकार लोकांच्या दबावामुळे बंदी घालत आहे. अतिवृष्टीने जे नुकसान झालं तेव्हा पाहणी करत असतांना त्यांनी 2 दिवसात मदत करू सांगितले पण दहा दिवस झाले अजून मदत झाली नाही. 7 डिसेंबर रोजी बंदी घातली. याची मोठी किंमत शेकऱ्यांना मोजावी लागत आहे. सरकारने शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे, मार्ग काढला पाहिजे… असं देखील शरद पवार म्हणाले.

Published on: Dec 11, 2023 02:17 PM
370 कलम रद्द करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?
एक काळ असा होता जेव्हा.. धनंजय मुंडेंबाबत शरद पवारांची मिश्किल टिप्पणी