Lumpy Skin : शेतकऱ्यांनो चिंता सोडा, पशूसंवर्धन आयुक्तांचा सल्ला वाचा
राज्यातील 22 जिल्ह्यांमधील 577 गावांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे पशूसंवर्धन आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी सांगितले आहे. ही राज्यातील स्थिती असली तरी बाधित जनावरांपैकी 77 जणांचा मृत्यू झाला आहे. असे असले तरी 22 लाख लसींचे वाटप करण्यात आले आहे. ज्या गावात लम्पीची लागण झाली तेथून 5 किमी परिसरातील जनावरांना लसीकरण देण्याच्या सूचना आहेत.
पुणे : देशासह राज्यात आता ( Lumpy disease) लम्पी रोगाचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. लम्पी हा (Animal) जनावरांमध्ये संसर्गजन्य रोग असून त्याचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. राज्यातील 22 जिल्ह्यांमधील 577 गावांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे (Commissioner of Animal Husbandry) पशूसंवर्धन आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी सांगितले आहे. ही राज्यातील स्थिती असली तरी बाधित जनावरांपैकी 77 जणांचा मृत्यू झाला आहे. असे असले तरी 22 लाख लसींचे वाटप करण्यात आले आहे. ज्या गावात लम्पीची लागण झाली तेथून 5 किमी परिसरातील जनावरांना लसीकरण देण्याच्या सूचना आहेत. शिवाय शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवणे, माशा, गोमाश्या, गोचिड याची लागण होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन सिंह यांनी केले आहे. प्रशासकीय स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता गर्दीच्या ठिकाणी जनावरे घेऊन जाणे टाळावे लागणार आहे. शिवाय आठवडी बाजार भरवण्याचेही धाडस करु नये असा सल्ला आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी दिला आहे.