अयोध्येच्या वारी नंतर मुख्यमंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, प्रशासनाला दिले ‘हे’ मोठे आदेश
VIDEO | अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे झालेल्या नुकसानाबाबात मुख्यमंत्र्यांचा नाशिक दौरा, एकनाथ शिंदे यांनी दिला शेतकऱ्यांना शब्द
नाशिक : गेल्या दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री आमदार आणि इतर पदाधिकारी हे आयोध्येत प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी गेले होते. तो दौरा पूर्ण करून महाराष्ट्रात परतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट नाशिक दौरा केला. यावेळी त्यांनी जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यामध्ये कांदा, द्राक्ष, डाळिंब, आणि गहू यांसह विविध पिकांचं नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात असतांना एकनाथ शिंदे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झालेत. यावेळी ते म्हणाले, अवकाळी पावसामुळे सर्वाधित कांद्यांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मुख्य सचिवांसह राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना युद्ध पातळीवर पंचनामे करून त्याचा अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.