VIDEO : Fast News | 12 PM | महत्वाच्या बातम्या | 27 April 2022
राणा दाम्पत्याने अंडरवर्ल्ड डॉन लकडावालाकडून पैसे घेतले. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गप्प का, असा सवाल बुधवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. ते मुंबईत बोलत होते. राऊत म्हणाले, त्यातला एक पुरावा मी समोर आणला आहे. राणा दाम्पत्य जे अचानक राम आणि हनुमान भक्त झाले. त्यात ते इतके डुबले की, मुंबईत येऊन धिंगाणा करू लागले. मुंबईतील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला.
राणा दाम्पत्याने अंडरवर्ल्ड डॉन लकडावालाकडून पैसे घेतले. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गप्प का, असा सवाल बुधवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. ते मुंबईत बोलत होते. राऊत म्हणाले, त्यातला एक पुरावा मी समोर आणला आहे. राणा दाम्पत्य जे अचानक राम आणि हनुमान भक्त झाले. त्यात ते इतके डुबले की, मुंबईत येऊन धिंगाणा करू लागले. मुंबईतील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न झाला. हनुमान चालिसाच्या निमित्ताने वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामागे अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे. 92 च्या दंगलीत अंडरवर्ल्ड कनेक्शन, पाकिस्तान कनेक्शन, डी गँग कनेक्शन असणाऱ्या अनेक माफिया टोळ्या होत्या. मला आता दिसते आहे, सरकारला दिसते आहे, हे जे 15 दिवसात घडते आहे, त्यात पुन्हा एकदा त्याच प्रकारचे वातावरण निर्माण करण्याचे काम सुरू आहे.