ठाण्यात मारहाण झालेल्या रोशनी शिंदे यांच्यावरच गुन्हा दाखल, काय आहे कारण?
VIDEO | ठाण्यात ठाकरे गटाच्या ज्या महिला कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली होती, त्याच महिलेविरोधात पोलिसांनी दाखल केला गुन्हा
ठाणे : ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना काही महिलांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, या मारहाणीत रोशनी शिंदे या जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणावरुन ठाण्यातील राजकीय वातावरण तापले असून एकच खळबळ उडाली आहे. अशातच या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी जखमी रोशनी शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रोशनी शिंदे यांनी सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट केली असून त्यावरून राजकारण तापलं होतं. त्याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.