धक्कादायक! जयपूर-मुंबई पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार, नेमकं काय घडलं? किती जणांचा मृत्यू?
VIDEO | जयपूर - मुंबई पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार? गोळीबाराचं कारण काय? नेमकं काय घडलं? किती जणांचा मृत्यू?वाचा सविस्तर
मुंबई, 31 जुलै 2023 | जयपूर ते मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दहिसर ते मीरा रोड दरम्यान जयपूर मुंबई पॅसेंजर एक्स्प्रेसवर गोळीबार करण्यात आला असून पालघर रेल्वे स्थानकाजवळ पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आहे. पॅसेंजरच्या बी-5 बोगीमध्ये हा गोळीबार झाला आहे. गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या मृतांमध्ये एका पोलिसाचाही समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरपीएफच्या कॉन्स्टेबलनेच हा गोळीबार केल्याची माहिती समोर येतेय. सध्या आरोपी कॉन्स्टेबलला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र हा गोळीबार करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. घडलेल्या घटनेनंतर जयपूर ते मुंबई पॅसेंजर ट्रेनमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. ही पॅसेंजर ट्रेन मुंबई सेंट्रल स्थानकात दाखल होताच पोलीस पथक, रेल्वे पोलीस पथकाकडून ट्रेनमध्ये पाहणी करण्यात आली.