आधी आरोप, आता पोस्ट डिलीट, शरद पोक्षें का भडकले?

आधी आरोप, आता पोस्ट डिलीट, शरद पोक्षें का भडकले?

| Updated on: Dec 07, 2021 | 5:43 PM

मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) पुन्हा एकदा त्यांच्या पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. शरद पोंक्षे यांनी ब्राह्मण संघाच्या आनंद दवे (Anand Dave) यांच्यावर काही आरोप केले होते.

मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) पुन्हा एकदा त्यांच्या पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. शरद पोंक्षे यांनी ब्राह्मण संघाच्या आनंद दवे (Anand Dave) यांच्यावर काही आरोप केले होते. आनंद दवे यांनी आपली आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला होता. एका कार्यक्रमासाठी बोलावून हॅाटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन देऊन, त्यासाठीचे बील न भरल्याने आपल्याला त्रास झाल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले होते. शरद पोंक्षे यांची ही सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाल्यानंतर डिलीट करण्यात आली आहे. मात्र, आता या पोस्ट वरून चर्चा रंगल्या आहेत.

“माझ्या मी व नथुराम ह्या पुस्तकाच्या 8 व्या आवृत्तीचं लोकार्पण पुण्यातील श्री आनंद दवे ह्यांनी त्यांच्या ब्राह्मण महासंघातर्फे करायचं ठरवलं. त्यासाठी आम्ही मी व प्रकाशक पार्थ बावस्कर पुण्यात पोहोचलो. हॉटेलवर कृष्णा रेसिडेंसीवर दोन खोल्या दवेंनी बूक केल्या. कार्यक्रम संपवून आम्ही घरी परतलो. या घटनेला महिना होऊन गेला तरी आजतागयात दवेंनी कृष्णा हॉटेलचे पैसे भरलेले नाहीत, व ते फोनही ऊचलत नाहीत. ब्राह्मण संघातर्फे कार्यक्रम केला म्हणून मी हो म्हटले पण हा माणूस मला नेहमीच डँबीस आहे असा संशय होताच त्याने ते सिध्द केले. अखेर प्रकाशकांनी ते पैसे भरले. तेव्हा सर्वांनी दवे बरोबर कोणताही व्यवहार करू नये ही विनंती, सोबत त्याचा फोटो देत आहे. तसेच समस्त ब्राह्मण संघातील सभासदांनी सावध रहावे’, अशी पोस्ट त्यांनी लिहिली होती, जी आता काढून टाकण्यात आली आहे.”