मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार? मंत्रिपदांसाठी भांडू अन् अधिवेशन सोडू..

मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार? मंत्रिपदांसाठी भांडू अन् अधिवेशन सोडू..

| Updated on: Dec 18, 2024 | 11:00 AM

अनेक दशकांनंतर बहुमताचा आकडा गाठूनही महायुतीतील नेत्याचे रूसवे-फुगवे काही थांबले नाहीत. आधी सरकार स्थापनेवेळी एकनाथ शिंदेंची नाराजी चर्चेत राहिली. सरकार ९ दिवसांनी स्थापन झालं. त्यानंतर तब्बल २० दिवसांनी महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला.

सरकार स्थापनेवेळी एकनाथ शिंदे यांची नाराजी चर्चेत राहिली. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारावेळी छगन भुजबळ नाराज झाल्यानंतर अजित पवार हे नॉट रिचेबल झाल्याचे पाहायला मिळाले आणि धक्कादायक म्हणजे मंत्रिपदाची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून अनेक नेते विधानपरिषदेचे हिवाळी अधिवेशन सोडून आपापल्या घरी परतलेत. अनेक दशकांनंतर बहुमताचा आकडा गाठूनही महायुतीतील नेत्याचे रूसवे-फुगवे काही थांबले नाहीत. आधी सरकार स्थापनेवेळी एकनाथ शिंदेंची नाराजी चर्चेत राहिली. सरकार ९ दिवसांनी स्थापन झालं. त्यानंतर तब्बल २० दिवसांनी महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यात अजून मंत्र्यांचं खातेवाटप, पालकमंत्री आणि महामंडळांचं वाटप शिल्लक असताना नाराजीराव आतापासूनच दबावतंत्र आणताय. ऐरवी सरकारमध्ये एकूण ४३ मंत्री असतात. ज्यामध्ये ३३ जणांना कॅबिनेट आणि १० जणांना राज्यमंत्री केलं जातं. यावेळी आधीपासूनच शिंदे, दादा आणि फडणवीस आधीपासूनच कॅबिनेटमंत्री होते. तर झालेल्या शपथविधीवेळी ३३ कॅबिनेटमंत्री आणि ६ जणांना राज्यमंत्री केलं गेलं. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपच्या १९ जणांपैकी १६ कॅबिनेट तर ३ राज्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ११ पैकी ९ जण कॅबिनेट तर दोन जण राज्यमंत्री झालेत. यासेबतच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ९ जणांपैकी ८ जणांनी कॅबिनेट तर एकाने राज्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Dec 18, 2024 11:00 AM