छगन भुजबळ यांचं मंत्रिपद अजितदादांनी मंत्रिपद नाकारलं? आक्रमक भुजबळ मोठा निर्णय घेणार?
छगन भुजबळांनी बंडाचं निशाण फडकावल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या निर्णय प्रक्रियेवरही त्यांनी सवाल केला. अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे तिघेच निर्णय घेतात, माझा शून्य सहभाग असतो असं छगन भुजबळ म्हणालेत
मंत्रिमंडळातून पत्ता कट केल्यानंतर छगन भुजबळ आक्रमक आहेत. निर्णय घेणार असं सांगत छगन भुजबळांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू केल्यात. तर दुसरीकडे अजित पवार दोन दिवसांपासून हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच नॉट रिचेबल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. छगन भुजबळांनी बंडाचं निशाण फडकावल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या निर्णय प्रक्रियेवरही त्यांनी सवाल केला. अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे तिघेच निर्णय घेतात, माझा शून्य सहभाग असतो असं छगन भुजबळ म्हणालेत. तर मंत्रिमंडळातून पत्ता कट केल्यानंतर छगन भुजबळांनी आपण नाराज असल्याचे जाहीरपणे सांगितले. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या मंत्रिपदासाठी आग्रह धरल्याचं सांगत नेमकं मंत्रिपद कोणी नाकारलं यावरून देखील छगन भुजबळांनी अजित पवार यांच्याकडे बोट दाखवलं आहे. एकीकडे छगन भुजबळ आक्रमक झालेत तर दुसरीकडे भुजबळ समर्थकांनी आंदोलनं सुरू केलीत. तर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे मात्र दोन दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. नागपुरात हिवाळी अधिवशेन सुरू होऊन दोन दिवस उलटले तरी मात्र अजितदादांची उपस्थिती काही दिसली नाही. अशातच छगन भुजबळांनी आपण मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत दिलेत आधी नाशिक आणि येवल्यात भुजबळांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठकही घेतली. त्यानंतर पुन्हा अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव न घेता त्यांनी निशाणा साधलाय बघा काय म्हणाले भुजबळ?
![मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार? मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/not-reacheable-dada-1-1.jpg?w=280&ar=16:9)
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
![भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार? भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/not-reacheable-dada-.jpg?w=280&ar=16:9)
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
![ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/tmt-.jpg?w=280&ar=16:9)
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
!['...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला '...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/11/Yewla-Constituency-Chhagan-Bhujbal-Manoj-Jarange-Patil.jpg?w=280&ar=16:9)
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
![उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा? उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/10/uddhav-thackeray-and-devendra-fadnavis.jpg?w=280&ar=16:9)