क्युरेटिव्ह पिटीशनने तिढा सुटणार? मराठा आरक्षणासंदर्भातील आज पहिली सुनावणी, कोर्टात काय घडणार?
सुप्रीम कोर्टात ही सुनावणी होणा असून क्युरेटिव्ह पिटीशनने तिढा सुटणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटीशन याचिकेवर आज सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर ही सुनावणी पार पडणार
मुंबई, २४ जानेवारी २०२४ : मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारल्यानंतर आज पहिली सुनावणी होत आहे. सुप्रीम कोर्टात ही सुनावणी होणा असून क्युरेटिव्ह पिटीशनने तिढा सुटणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटीशन याचिकेवर आज सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. तर या संदर्भातील खुली सुनावणी घ्यायची की नाही हे ३ न्यायमूर्तीचं चेंबर ठरवणार आहे. जर खुली सुनावणी घ्यायची ठरल्यास नवी तारीख देण्यात येईल. निकालात काढलेल्या त्रुटींवरून न्यायमूर्ती सरकारला सूचना करू शकतात. तर त्रुटींसंदर्भात सूचना दिल्यास सरकारला त्रुटी दूर करून अहवाल सादर करण्यासाठी वेळ दिला जाईल. पुनर्विचार याचिका फेटाळली जाऊ शकते. क्युरेटिव्ह पिटीशन याचिकेवर खुल्या स्वरूपात सुनावणी घेण्यात यावी, मराठा संघटनांनी मागणी केली.