वाहनावर लाठ्या-काठ्यांनी झालेल्या हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे यांच्यावर सडकून टीका करत एकेरी उल्लेख केला. जितेंद्र आव्हाड म्हणाले....
शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे यांच्यावर सडकून टीका करत एकेरी उल्लेख केला. जितेंद्र आव्हाड म्हणाले, ज्यांना मी यापूर्वी छत्रपती संभाजीराजे म्हणायचो त्यांना माझा निरोप आहे. ज्या प्रमाणे सगळं तू विशाळगडावर पेटवलं, महाराष्ट्रात दंगली घडतील असे आराखडे आखले गेले. यापुढे मी तुम्हाला म्हणणार नाही. मी तुला म्हणेन. कारण ही लढाई विचारांची आहे. तुम्ही ज्या विचारांवर जात आहात ते शाहू महाराजांचे विचार नव्हते. हे तुमच्या वडिलांचे सुद्धा विचार नाहीत. एखाद्या मुलाने आपल्या वडिलांचे विचार खोडून टाकावे हे नजीकच्या इतिहासात कधी घडलं नसेल. वडिलांनी तुमचा निषेध करणं हे बेदखल करण्यासारखं आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. हल्ल्याबद्दल म्हणताना आव्हाड म्हणाले, मी तर पुढे बसलो होतो. मला फक्त आवाज आला की, गाडीवर काहीतरी पडल्याचा आवाज आला. पुढे जाऊन थांबलो. तोपर्यंत हे उलटे फिरले. तीन पोरं होती. माझ्या पोलिसांकडे 4 रिव्हॉल्वहर होते, 24 गोळ्या होत्या. चार पोलीस होते. या असल्या भ्याड हल्ल्याने माझ्या धर्मनिरपेक्षतावर काही फरक पडणार नाही, असेही आव्हाड म्हणाले.