मला काहीच येत नाही... मराठा सर्वेक्षण करण्यासाठी पहिली पास असणारा कर्मचारी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

मला काहीच येत नाही… मराठा सर्वेक्षण करण्यासाठी पहिली पास असणारा कर्मचारी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

| Updated on: Jan 25, 2024 | 1:13 PM

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आले असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मराठा सर्वेक्षण करण्यासाठी पालिकेकडून चक्क इयत्ता पहिली पास असणाऱ्या कर्मचाऱ्याची नेमणूक

अहमदनगर, २५ जानेवारी २०२४ : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण गेल्या काही दिवसांपासून सुरू झाले आहे. गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आले असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मराठा सर्वेक्षण करण्यासाठी पालिकेकडून चक्क इयत्ता पहिली पास असणाऱ्या कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. अहमदनगर येथील हा धक्कादायक प्रकर असून अहमदनगर महापालिकेच्या सर्वेक्षण कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. दरम्यान या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मराठा सर्वेक्षण करणारा हा कर्मचारी मला काहीच येत नाही, असे म्हणत या पहिली पास असणाऱ्या कर्मचाऱ्याने लोकांसमोरच उघडपणे कबुली दिली आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे मराठा सर्वेक्षणाच्या कामासाठी नेमलेले कर्मचारी अशिक्षित आणि अप्रशिक्षित असल्याचे आता समोर येत आहे.

Published on: Jan 25, 2024 12:43 PM