Special Report | 5 विरोधकांचा मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांना चौफेर घेराव

| Updated on: Apr 23, 2022 | 11:16 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप नेते मोहित कंबोज, भाजप नेते किरीट सोमैय्या, राणा दाम्पत्य, नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय. स्वतः मुख्यमंत्री असो किंवा त्याचे मंत्री यांना घेरण्याची संधी या नेत्यांनी सोडली नाही.

मुंबई : पाच विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप नेते मोहित कंबोज, भाजप नेते किरीट सोमैय्या, राणा दाम्पत्य, नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय. स्वतः मुख्यमंत्री असो किंवा त्याचे मंत्री यांना घेरण्याची संधी या नेत्यांनी सोडली नाही. मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज ठाकरेंनी 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिलाय. शिवसेनेच्या हिंदुत्वावरच सवाल उपस्थित करुन नवनीत राणांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान दिले. मात्र पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि शिवसेनेच्या आक्रमकपणामुळे त्यांनी माघार घेतली.