नागरिकांच्या जीवाशी कुठं होतोय खेळ? भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या कारखान्यावर छापा अन् लाखो लीटर दूध

VIDEO | नाशिक जिल्ह्यातील भेसळयुक्त दूध बनवणाऱ्यांना विरोधात कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाने संयुक्तिक कारवाई करत लाखो लिटर भेसळयुक्त दूध नष्ट केले आहे

नागरिकांच्या जीवाशी कुठं होतोय खेळ? भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या कारखान्यावर छापा अन् लाखो लीटर दूध
Follow us
| Updated on: Sep 04, 2023 | 8:37 AM

नाशिक, ४ सप्टेंबर २०२३ | नाशिक जिल्ह्यातील भेसळयुक्त दूध बनवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी नाशिक जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या पथकाने नाशिकच्या सिन्नर मिरगाव मध्ये भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकत कारवाई केली आहे. जिल्हा प्रशासन पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाने संयुक्तिक कारवाई करत लाखो लिटर भेसळयुक्त दूध नष्ट केले आहे, मिल्क पावडर आणि कॉस्टिक सोडा यापासून हे भेसळयुक्त दूध बनवलं जात होता नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील ओम सद्गुरु या दूध संकलन करणाऱ्या केंद्रावर छापा टाकत ही कारवाई करण्यात आली आहे, या कारवाईत रासायनिक मिल्क लिस्ट पावडर आणि कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारा कास्टिंग सोड्याचा मोठा साठाही मिळून आला आहे, नाशिक जिल्ह्यात भेसळयुक्त दूध मोठ्या प्रमाणात येत असल्याचा संशयावरून जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाच्या मदतीने ही धडक कारवाई केली आहे प्रशासनाच्या या कारवाईने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत, याप्रकरणी दूध संकलन केंद्र चालकासह या केंद्राला रासायनिक पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या विरोधातही सिन्नर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आजवरची सर्वात मोठी कारवाई आहे.

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.