Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबईमध्ये अग्‍निशमन दलाच्या ताफ्यात परदेशी बनावटीचा रोबोट दाखल

नवी मुंबईमध्ये अग्‍निशमन दलाच्या ताफ्यात परदेशी बनावटीचा रोबोट दाखल

| Updated on: Feb 10, 2022 | 12:46 PM

नवी मुंबई (Navi Mumbai) अग्‍निशमन विभागाच्या ताफ्यात आता परदेशी बनावटीचा रोबोट (Robot)दाखल आहे.

नवी मुंबई (Navi Mumbai) अग्‍निशमन विभागाच्या ताफ्यात आता परदेशी बनावटीचा रोबोट (Robot)दाखल आहे. आगीवर नियंत्रण मिळवतांना सुदैवाने आजतागायत एकही जीवित हानी झाली नाही. मात्र अशा घटनांमध्ये प्रसंगी अग्निशमन (Fire) दलाचे जवान जखमी होतात. त्यांच्यासाठी हा रोबोट म्हणजे एक प्रकारे सुरक्षा कवच ठरणार आहे. नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमनफ्रान्स येथील पोक या नामांकित कंपनीकडून हा रोबोट खरेदी करण्यात आला असून त्याची किंमत तबब्ल 85 लाख रुपये आहे. हा रोबोट अडीचशे ते तीनशे मीटर अंतरावरून ऑपरेट करता येतोे. ज्या अरुंद ठिकाणी मनुष्य शिरणार नाही अशा धोकादायक प्रसंगात रोबोट रिमोट कंट्रोल माध्यमातून आत प्रवेश करून धगधगत्या ज्वालांवर पाणी फवारणार आहे. या रोबोटला दोन बॅटर्‍या असून तो तब्बल 4 तास आगीशी सामना करू शकतो. रासायनिक वा ज्वलनशील पदार्थांना आग लागल्यास त्या आगीवर आता सहज नियंत्रण मिळवता येईल.

Published on: Feb 10, 2022 12:46 PM