‘राष्ट्रपती राजवट आणा नाही तर काही करा…आम्ही…, ‘ काय म्हणाले कॉंग्रेसचे नेते
आम्ही आमच्या पद्धतीने प्रतिकार करणार आहे असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. आता महायुतीचे सरकारला जर राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल तर खुशाल लागू करावी असे आव्हानच पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहे.
कॉंग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुतीवर तोफ डागली आहे.आमच्या काळात कोविडचे आव्हान होते. तरी आम्ही राज्य मागे जाऊ दिलेले नाही परंतू साल 2014 पासून महाराष्ट्र दरडोई उत्पनात पहिला असलेला महाराष्ट्र अकराव्या कम्रांकावर गेला आहे असे विधीमंडळात अर्थमंत्रालयातच कबूली दिलेली आहे. आता तर तो आकडा आणखी मागे गेला आहे. आता निवडणूका आणखी पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो. आम्ही आता कोणत्याही आव्हानासाठी सामोरे जाण्यासाठी तयार आहोत. तुम्हाला आणीबाणी लादायची असेल किंवा राष्ट्रपती राजवट लागू करायची तर करा असे थेट आव्हान कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहे.
Published on: Aug 31, 2024 04:54 PM
Latest Videos