खासदार माने, मंडलिकांच्या अडचणी वाढल्या? लोकसभा मतदार संघात काँग्रेसने कंबर कसली
शिवसेनेत फूट पडल्यानंतर आधी उद्धव ठाकरे गटातच राहणार अशी भूमिका शिवसेनेच्या दोन्ही खासदारांनी घेतली होती. मात्र काहीच तासात त्यांनी आपल्याच त्या शब्दांपासून घुमजाव करत शिंदे गटात प्रेवश केला होता. त्यानंतर आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडं गेला आहे.
कोल्हापूर, 12 ऑगस्ट 2023 |शिवसेनेत उभी पडल्यापासून एका वर्षात कोल्हापूरच्या राजकारणाच्या पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आधी उद्धव ठाकरे गटातच राहणार अशी भूमिका शिवसेनेच्या दोन्ही खासदारांनी घेतली होती. मात्र काहीच तासात त्यांनी आपल्याच त्या शब्दांपासून घुमजाव करत शिंदे गटात प्रेवश केला होता. त्यानंतर आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडं गेला आहे. तर येथे काँग्रेसची ताकद आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची पकड असल्याने आता काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. तर लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. ते आज इंचलकरंजी येथे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील पदाधीकारी यांची बैठक घेणार आहेत. त्यामुळे याच्याआधी खासदार संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशील माने यांच्या समोर काँग्रेस कडवे आव्हान उभे करेल अशी चर्चा येथे होत आहे.