Sangram Thopate : काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश, बड्या नेत्यांच्या उपस्थितीत हाती घेतलं ‘कमळ’ अन्…
संग्राम थोपटे यांनी नुकताच फेसबूक प्रोफाईलवरील कव्हर फोटोवर असलेलं काँग्रेस पक्षाचं चिन्ह काढून नवा फोटो अपलोट केला होता. या नव्या फोटोमध्ये फक्त संग्राम थोपटे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला असून केवळ त्यांच्याच फोटो दिसतोय.
पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम केलं आहे. आज मंगळवार 22 एप्रिल 2025 रोजी संग्राम थोपटे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचे पाहायला मिळाले. नुकत्याच भोर येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला होता. यावेळी थोपटेंनी काँग्रेस पक्षाकडून सातत्याने दुर्लक्ष झाल्याची खंत व्यक्त केली होती आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार काँग्रेसला राम राम करत भाजपचं कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले होती. दरम्यान आज संग्राम थोपटे यांनी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी थोपटेंसह प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी देखील भाजपात प्रवेश केल्याचे पाहायला मिळाले.
संग्राम थोपटे यांच्या निर्णयानंतर पुण्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसला असल्याचे सांगितले जात आहे. संग्राम थोपटे हे तीन वेळा पुणे भोर विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. या मतदारसंघात त्यांचं मोठं वर्चस्व असून गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराकडून त्यांचा दारूण पराभव झाला होता.

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?

'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा

पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा

'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
