Sangram Thopate : ‘खरं सांगायचं तर ही वेळ…’, संग्राम थोपटेंचा भाजपात प्रवेश अन् सांगितलं काँग्रेस सोडण्याचं कारण, खंतही केली व्यक्त
गेल्या काही दिवसांपासून संग्राम थोपडे हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार, संग्राम थोपटे हे पक्षात नाराज? अशा चर्चा सुरू होत्या. अशातच आज संग्राम थोपटे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांनी पक्ष सोडण्याचं कारण सांगत सर्वच चर्चांना पूर्णविराम लावला आहे.
काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा आज मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश पार पडला. पक्षप्रवेश करताच त्यांनी काँग्रेस सोडण्याचं कारण सांगितलं. ‘मला अनेकांनी प्रश्न विचारला गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या वडिलांपासून तुम्ही काँग्रेस वाढवली मग तुम्ही काँग्रेस का सोडताय? खरं सांगायचं तर ही वेळ माझ्यावर काँग्रेसने आणली.’, असं संग्राम थोपटे यांनी भाजप पक्षात प्रवेश करताच म्हटलं. पुढे बोलत असताना ते म्हणाले, विधिमंडळात असल्यानंतर वारंवार विखे पाटील सांगायचे निर्णय घे… यासह भाजपचे बडे नेते सातत्याने सांगायचे की तुम्ही योग्य निर्णय घ्या…पण मी त्यांना सांगायचो मी काही निर्णय घेऊ शकत नाही. ते सांगायचे किती दिवस तुझ्यावर अन्याय होतोय. पण मी विचाराला बांधलेला कार्यकर्ता असल्याने माझ्याकडून लवकर निर्णय होत नव्हता, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी संग्राम थोपटे यांनी एक खंत बोलून दाखवली. ते म्हणाले, कित्येक वर्षांपासून निष्ठेने जे काम केलं त्या निष्ठेचं कोणतंच फळ पदरात पडल नाही. अनेक वर्षांपासून संघर्ष केला. पण कधी डगमगलो नाही आणि एकहाती सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला, असं त्यांनी सांगितलं

ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम

पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच

'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'

...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
